शाळेची सर्वसाधारण माहिती
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडोशी
केंद्र :- पारसोंड
ता. महाबळेश्वर , जि. सातारा.
शाळेतील शिक्षक मंजूर :- २. कार्यरत :- २. लोकसंख्या :- ७१. पटसंख्या :- ०२.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोंडोशी ता.महाबळेश्वर जि.सातारा
गावाची वैशिष्टे व प्राश्वभूमी:-
निसर्गाच्या सानिध्यात,डोंगराच्या अगदीच कुशीत,रायगड,रत्नागिरी सीमेवर व ‘प्रतापगड’ किल्ल्याच्या दक्षिणेस कोयनेच्या खोऱ्यात वसलेले ‘कोंडोशी’ हे कमी लोकसंख्येचे गाव.गावात जाण्यासाठी जीव मुठीत धरून आजही कड्याच्या दगडी पायऱ्यांवरून चालत जाणे हे खास.
गावातील उल्लेखनीय बाबी :-
गावातील सर्व लोक गरीब कष्टाळू आहेत.उत्पन्नाचे साधन नसल्याने तरुण वर्गाचे पुणे – मुंबई येथे रोजगाराच्या निमित्ताने स्थलांतराचे प्रमाण जरी अधिक असले तरी,गावात सन,यात्रा उत्सव साजरे करण्यासाठी सर्व एकत्र येतात. होळीचा सन म्हणजे गावची पर्वणीच समजली जाते.
शाळेची वैशिष्टे :-
शाळेत इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंतचे वर्ग जरी असले तरी विद्यार्थी पटसंख्या फक्त ०२ आहे.शाळेसमोर अगदीच छोटे मैदान असून शाळेतील मुले येथे खेळतात.शाळेचा पट कमी असल्यामुळे संगणक ई.लर्निंग साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन केले जाते.शाळेत १ संगणक,१ प्रोजेक्टर व स्व:निर्मित ई लर्निंग साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. शाळेस ISO मानांकन प्राप्त आहे
शाळेच्या उल्लेखनीय बाबी :-
शाळेचे दोघेही शिक्षक उच्च गुणवत्ताधारक व नवोपक्रमशील आहेत. विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास उपक्रम, क्रीडा स्पर्धा, स्पर्धा परीक्षा असे उपक्रम राबविले जातात. शाळेत विद्यार्थीकेंद्री शिक्षणावर अधिक भर दिला जातो.थोडक्यात शाळा अतिदुर्गम भागात असली तरी सर्व उपक्रम राबविले जातात.
शाळेच्या गरजा :-
शाळेस एकच इमारत आहे.निसर्ग चक्रीवादळामुळे पत्रे उडून भिंतींना तडे गेलेले आहेत त्यामुळे इमारत दुरुस्ती,बाथरूम दुरुस्ती, विद्यार्थांना TAB सुविधा.
शाळेबाबत सर्वसाधारण अभिप्राय :-
निसर्गाच्या कुशीत शाळा परिसर असल्याने विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात अध्ययन-अध्यापन केले जाते. शाळा परिसर सुंदर आहे. सर्व शिक्षक उपक्रमशील व नाविन्याचा ध्यास घेतलेले आहेत. शाळेची गुणवत्ता उत्तम आहे.
No comments:
Post a Comment